Friday, August 3, 2018

स्त्रीचे समाधान होण्यासाठी शिश्नाची आदर्श नमुनेदार लांबी किती असावी?

शिश्न आणि ताठरता

स्त्रीचे समाधान होण्यासाठी शिश्नाची आदर्श नमुनेदार लांबी किती असावी?

शिश्न-योनी संभोगात स्त्रीचं समाधान लिंगाच्या आकारावर अवलंबून नसतं तर पुरूषाच्या तिला उत्तेजित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. पुरूषाला स्त्रीच्या योनीमार्गातील सुरूवातीचा एकदोन इंचाचा भागच संवेदनशील असतो. त्या भागातील घर्षणावरच स्त्रीचा आनंद अवलंबून असतो हे प्रत्येक पुरूषाला माहित असायला हवं. लैंगिक मज्जातंतू याच भागात केंद्रित झालेले असतात. म्हणूनच ताठरलेलं शिश्न फक्त दोन इंच लांब असेल तरी घर्षणातुन मिळणारा आनंद स्त्रीला मिळणारच, थोडक्यात शिश्नाची आदर्श लांबी वगैरे काही नसते. म्हणूनच शिश्नाच्या बाबतीत म्हणतात ‘आकार अजिबात महत्वाचा नाही’ स्त्रीच्या समाधानासाठी.

शिश्नाची आदर्श जाडी किती असावी?

शिश्नाची लांबी घर्षणाचं सुख देण्यात फारशी महत्वाची बाब नसली तरी काही स्त्रियांच्या मते, शिश्न जर जाड असेल तर घर्षण सुख अधिक आवेगाने मिळते. शिश्नाचा घेर जितका अधिक तितका स्त्रीला योनीभर लिंग घर्षणाचं मानसिक समाधान मिळतं. अर्थात ते स्त्रीच्या योनीतील स्नायूंवर अवलंबून असतं. या स्नायूंचा ताण कमी असेल (स्नायू शिथिल असतील) तर योनी मार्गातील शिश्नाला आवळून धरण्याची पकड कमी असेल म्हणूनच ज्या स्त्रीयांचे योनीमार्गातील स्नायू सैल (झालेले) असतात त्यांचा कल जास्त जाडीच्या /घेरांच्या शिश्नाकडे असतो.

योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी, ताठ झालेलं शिश्न किती कडक / कठीण (टणक) असायला हवे?

योनीमार्गात प्रवेशासाठी शिश्नं दगडासारखं/लोखंडाच्या कांबीसारखं कडक असायला हवं ही एक गैरसमजूत आहे. थोडीफार जरी ताठरता आली असेल तरी शिश्न योनीत प्रवेश करू शकते. अशावेळी स्त्रीचे सहकार्य आणि ओलसर झालेली योनी या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. स्त्रीनं शिश्नाला आधार देवून आत सरकवायला मदत करणे अभिप्रेत असते. याला स्टफिग तंत्र (आत भरायचं तंत्र) म्हणतात. एकदा का शिश्नानी योनीमार्गात प्रवेश केला की तेथील उबं, ओलावा आणि घर्षाणामुळे ताठरता कठीण/ टणक होते.

शिश्नाची लांबी कशी वाढविता येते? माणसाच्या बांध्यावर/ शरीरमानावर ती अवलंबून असते का?

शिश्नाची लांबी आणि स्त्रीचं समाधान यांचा काही संबंध नाही ते वर सांगितलेच आहे. पण पार खोलवर मनात घर करून बसलेल्या कल्पनांमुळे काही जण अवास्तव आणि अवाजवी खर्च करून, शिश्नाची लांबी वाढविण्याची शस्त्रक्रिया करून घेतात. खरं तर त्याची अजिबात गरज नसते. उलटपक्षी शस्त्रक्रियेमुळे शिश्नातील स्नायू अशक्त होतात, आणि ताठरतेची गुणवत्ता बिघडते. वास्तविक पुरूषांची कामक्षमता त्याच्या याच स्नायूंच्या शक्तीवर अवलंबून असते. लुळे असलेल्या शिश्नाचा आकार, पोकळ्या असलेल्या पेशीजालातील रक्ताच्या प्रमाणवर अवलंबून असते. परंतु ताठरलेल्या शिश्नाची लांबी अनुवंशिक घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक माणसाच्या ताठरलेलं शिश्नाची वेगळी अशी वैशिष्ट्ये असतात. माणसाचं शरीरमान आणि त्याच्या ताठरलेल्या लिंगाचा आकार यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. या दोन गोष्टी दोन स्वतंत्र जनुकांवर अवलंबुन असतात. शारीरिक जनुक आणि लैंगिक जनुकं वेगवेगळी असतात.

शिश्नाची लांबी ही लुळ्या असलेल्या शिश्नाच्या लांबीवर अवलंबून असते का?

अजिबात नाही. ताठरलेल्या शिश्नाची लांबी हे व्यक्ती वैशिष्ट्य आहे. तर लुळ्या असलेल्यां शिश्नाची लांबी पोकळ्या असलेल्या पेशीजालातील रक्ताचे प्रमाणावर अवलंबून असल्याचे वर सांगितले आहेच.

शिश्नाला ताठरता कशी येते?

शिश्नाला ताठरता येणं ही एक हेमो-डायनामिक (रक्ताच्या गतीशीलतेने होणारी) प्रक्रिया आहे. शिश्नामध्ये तीन नलिका असतात. या नलिकात असंख्य स्पंजी पेशीजाल असते आणि भरपूर रक्तवाहिन्या असतात. शिश्नातील रक्तवाहिन्या रक्ताने भरल्यावर स्पंजी पेशीजालचे आकारमान वाढते आणि नलिका लांब प्रसरण पावतात. लैगिंक विटपासंबंधीचे स्नायु आकुंचन पावतात आणि शिश्नाला ताठरता येते.

प्रत्येक वेळेची ताठरता कठीणच का नसते?

ताठरलेल्या शिश्नाचा कठीणपणा/कडकपणा हा शिश्नांतील रक्ताचे प्रमाण आणि शिश्नाच्या मुळाशी असलेल्या, पेरीनियम भागातील लैंगिक स्नायूंच्या आकुंचनावर अवलंबून असते. जर दोन्ही पैकी एक घटक किंवा दोन्ही घटकांचे अपेक्षित कार्य झाले नाही तर ताठरता (तितकी) कठीण नाही असे दिसते वा अनुभवास येते.

No comments:

Post a Comment