Thursday, August 2, 2018

कंडोम वाटून साजरा केला प्रेमाचा दिवस...

व्हॅलेंटाईन डे हा नवे प्रेमसंबंध सुरु करण्याच्या दृष्टीने तरुणांमध्ये विशेष दिवस मानला जातो. मात्र अडनिड्या वयात पडलेले चुकीचे पाऊल महागात पडू नये यासाठी थायलंडमध्ये मोफत कंडोम वाटप करण्यात आलं.
थायलंडमध्ये अनेक तरुण व्हॅलेंटाईन डे पहिल्यांदा शरीरसंबंधांचा अनुभव घेतात. म्हणूनच बँकॉकमध्ये आरोग्यविषयक जाणकार रुग्णालय आणि क्लिनिकमध्ये कंडोम्स वाटप करण्यात आलं. यातून तरुणांना सुरक्षित शरीरसंबंधांचा सल्ला देण्यात आला.
थायलंडमध्ये किशोरवयीन गर्भधारणेचं प्रमाण जास्त आहे. यंदा बँकॉकमध्ये 35 लाख कंडोम वाटण्यात आल्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment