Friday, August 10, 2018

सेक्स जीवनातील पाच मंत्र

सेक्स जीवनातील पाच मंत्र

नवविवाहित जोडप्यांसाठी सेक्स जीवनात सामंजस्यता निर्माण करण्यासाठी काही समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वर्षे सेक्स जीवनात ते संतुष्ट राहत नाहीत. यातील एक मोठी घटना आहे ती म्हणजे, सेक्सबाबत बैचेन राहणे होय. सेक्सबाबत दोघेही वेगळेविचार करतात किंवा वेगळा दृष्टीकोण असणे. या समस्येपासून दूर राहण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी सेक्सच्याबाबतीत पाच मंत्र लक्षात ठेवले पाहिजे.
विचार :
सेक्सकडे बघण्याचा विचार आणि दृष्टीकोण बदलला पाहिजे. आपल्याला सेक्सची आवड नसेल तर ती का नाही, हे जाणून घ्या. ही नावड अनावश्यक गोष्टींपासून झालेली नाही ना ! काहीजण एखाद्याचे ऐकून सेक्सकडे दुर्लक्ष करतात. धार्मिक गुरू काही ग्रंथांचा दाखला देतात. सेक्स करणे वाईट आहे. ब्रह्मचारी राहणे चांगले, असाही सल्ला दिला जातो. तो टाळला पाहिजे. अन्यथा वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो. सेक्स करणे हा जीवनाचा एक भाग हा विचार केला पाहिजे.
समजूतदारपणा :
सेक्सबाबत अधिक जाणून घेतले पाहिजे. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होत असेल तर ते टाळणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराची काय अपेक्षा आहे ते जाणून घेतले पाहिजे. ती पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. सेक्सबाबत बोलण्यात लाज बाळगू नका. आपल्या जोडीदाराबरोबर सेक्सबाबतीत स्पष्ट आणि उघड चर्चा करा.
 संवाद साधा :
वैवाहिक जीवनात जोडीदारांने संवाद साधण्यावर भर दिला पाहिजे. यशस्वी जीवनात सेक्सबाबत संवाद साधणे गरजेचे आहे. संवाद नसेल तर जीवनात तणाव निर्माण होतो. या तणावात सेक्सबाबतची भावना कमी होते. रूची राहत नाही. आपल्या जोडीदाराच्या भावना सजून घेण्यासाठी संवादावर भर दिला पाहिजे.
सकारात्मकता :
सेक्सकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक असला पाहिजे. कोणत्याही दबावाखाली सेक्सबाबत विचार करू नका. काहीवेळा अधिक उत्तेजीत होणे चुकीचे ठरू शकते.आपल्या प्रकृतीमुळेही नकारात्मक भावना निर्माण होते. याचा कोणताही परिणाम आपल्या सेक्स जीवनावर होऊ नये. नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे.
सहजपणा हवा :
सेक्सबाबत आपण सजग असणे आवश्यक आहे. ही एक नैसर्गिक क्रियाप्रक्रिया आहे. सेक्सबाबत प्रत्येक व्यक्तीची ईच्छा वेगवेगळी असते. सेक्सच्याबाबतीत आपण उत्साही नसाल तर आपला तो दोष नाही. मात्र, आपल्या जोडीदाराला काय हवे आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याप्रमाणे तुमच्या आचारणात सहजपणा हवा. तरच जीवनात आनंद घेऊ शकता. सेक्स लादू नका किंवा जबरदस्ती करू नका. नाहीतर जीवनात आनंद घेता येणार नाही.

No comments:

Post a Comment