Friday, August 3, 2018

शीघ्रपतन टाळण्यासाठी काय करावे?

माझं लग्न होऊन सहा वर्षं झाली. गेल्या चार महिन्यांपासून मला शीघ्रपतनाचा त्रास सुरू झाला आहे. यावर काही इलाज आहे का?

लग्नानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतरही शीघ्रपतनाची तक्रार असलेले काही पुरुष असतात. या पुरुषांमध्ये समागम करतेवेळी एक खास सूचना पाळण्याचं एक विशेष तंत्र डॉक्टर अनेकवेळा दांपत्यांना शिकवतात. संवेदनांचा आवेग सहन होण्यापलीकडे जाण्याआधीच जर समागम तात्पुरता थांबवलं आणि आवेगाची तीव्रता ओसरू द्यावा. 


या पद्धतीने समागमाचा काळ वीर्यस्खलन न होऊ देता वाढवता येऊ शकतो. यासाठी पती-पत्नीमध्ये एकमेकांना सूचना देण्याबाबत आधीच ठरवलेलं असणं गरजेचं असतं. समागम करतेवेळी जेव्हा संवेदना वाढत जातात तेव्हा संदवेनांचा आवेग अजून आपल्या आटोक्यात असतानाच समागम तात्पुरता थांबवून वीर्यस्खलन टाळता येऊ शकतं. आवेगाची तीव्रता कमी होताच समागम पुन्हा सुरू करता येऊ शकतो. अशा प्रकारे थांबत थांबत समागम होऊ दिल्यास शीघ्रपतनाची तक्रार मिटवता येऊ शकते.
दोन लैंगिक समागमांच्या दरम्यान जर खूप मोठा काळ गेला असेल तर त्यामुळेही शीघ्रपतनाची तक्रार उद्भवू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती काही कारणांमुळे बऱ्याच कालावधीसाठी समागम करत नाही, (किंवा इतर कुठल्या प्रकारेही वीर्यस्खलन होऊ देत नाही) तेव्हा शुक्रजंतूंचा मोठा साठा वृषणामध्ये साचला जातो. हा साठा काठोकाठ भरलेल्या पेल्याप्रमाणेच बाहेर वाहून जाण्यासाठी तत्पर असतो. 

अशा अवस्थेत संभोग सुरू करताच किंवा अगदी प्रणयक्रिडेदरम्यान सुद्धा अचानकपणे वीर्यपतन होण्याची शक्यता असते. स्त्रीच्या नुसत्या विचारानेही वीर्यस्खलन होणारे पुरुष आहेत. असा अनुभव आल्यास निराश न होता थोडासा वेळ मध्ये जाऊ देऊन एकापाठोपाठ दुसऱ्यांदा संभोग केल्यास शीघ्रपतन होत नाही. काही पुरुषांना संभोगासाठी लागणारी ताठरता शिश्नामध्ये पुन्हा निर्माण होण्यास खूप वेळ लागतो आणि दुसऱ्यांदा संभोग करणं लगेचच जमत नाही. अशा पुरुषांना संभोगाआधी काही तास हस्तमैथून करण्याचा सल्ला काही डॉक्टर देतात. याचा काहीजणांना उपयोग होतो.
शीघ्रपतनाचा संबंध, व्यक्तीच्या स्वभावात खोलवर भिनलेली अधिरता, उतावळेपणा व घाई याच्याशी असतो. अनेक पुरुष लैंगिक संबंध ठेवताना खूप अधीर होतात. स्वत:चा लैंगिक आवेग आवरणं त्यांना शक्य होत नाही. त्यांच्या स्वभावातला हा उतावळेपणाच लैंगिक संबंध ठेवताना नकळत त्यांच्या शरीरातून शीघ्रपतनाच्या रूपाने व्यक्त होऊ लागतो. यावर शारीरिक उपाय करून काहीच उपयोग होत नाही. कारण उतावळेपणा हा त्यांच्या मानसिकेतेचा पैलू आहे. अशा वेळी व्यक्तीच्या स्वभावातली अधिरता आणि उतावळेपणा कमी व्हावा यासाठी उपाय करणं गरजेच असतं. हा उपाय मनोचिकित्सा, समुपदेशन आणि सेक्स थेरपी यांच्या मदतीने करता येऊ शकतो.

No comments:

Post a Comment