Wednesday, August 8, 2018

सेक्सनंतर गुप्तांगात वेदना होताहेत? हे करा!

सेक्सनंतर गुप्तांगात वेदना होताहेत? हे करा!

प्रश्न: माझं वय ४० वर्षे आहे. तीन महिन्यांपूर्वी एका सेक्स वर्करसोबत सुरक्षित शारीरिक संबंध ठेवले होते. सेक्सनंतर जवळपास आठवडाभर गुप्तांगाला वेदना होत होत्या. संसर्गामुळं वेदना होत नसतील ना?
उत्तर: सेक्स करण्यापूर्वी तुम्ही सुरक्षिततेची काळजी घेतली होती. मग संसर्ग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वेदना होत असल्यास तंग अंतर्वस्त्रे घालू नका. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी तुम्हीच निर्णय घ्या. कृपया लवकरच एखाद्या युरोलॉजिस्टकडे जा. 

प्रश्न

मी ३६ वर्षांचा असून, माझ्या अनेक गर्लफ्रेंड आहेत. इरेक्शनसंबंधी समस्या असून, उत्तेजित होण्यासाठी मला स्वतःच्या निपल्सवर हात फिरवावा लागतो. मास्टरबेशनवेळीही उत्तेजित होत नाही. सोबतच्या महिलेला माझ्या निपल्सला हात लावण्यास सांगावं लागतं. त्यामुळं त्याही विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहतात. निपल्सला हात लावला तरच मी उत्तेजित होतो. यावर काही उपाय आहे काय? 

उत्तर

निपल्सना स्पर्श करून उत्तेजित होणं सामान्य बाब आहे. निपल्स हा तुमच्याच शरीराचा एक भाग आहे. त्यांना स्पर्श करून उत्तेजित होत असाल तर त्यात काहीही गैर नाही.

No comments:

Post a Comment