Wednesday, August 15, 2018

हस्तमैथुन : शाप की वरदान? समज, गैरसमज आणि तथ्य

हस्तमैथुन : शाप की वरदान? समज, गैरसमज आणि तथ्य
लैंगिक सुखाशी संबंधित असणार्या गोष्टींवर मोकळेपणाने न बोलण्याची एक सर्वमान्य प्रथा आपल्याकडे पहिल्यापासून चालत आलेली आहे. मुलगा किंवा मुलगी वयात येताना त्याच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पौगंडावस्थेत असताना होणारे हे बदल समजून घेणे, मानसिक पातळीवर ते बदल स्वीकारण्याची ताकद असणे, यासाठी त्या मुलाला/मुलीला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन मिळाले नाही तर प्रत्येक मुलामध्ये?मुलीमध्ये सेक्स, लैंगिक सुख, विरुध्द लिंगाच्या समवयस्क व्यक्तीशी होणारे आकर्षण याबद्दल अत्यंत चुकीच्या समजुती विकसित होत जातात.

या समजुती बऱ्याचदा थोड्या मोठ्या वयाच्या मुलांकडून मिळालेल्या ऐकीव माहितीवर आधारित असतात. आणि पुढे वय वाढल्यानंतर, कुमारावस्थेत, तारुण्यावस्थेत आल्यानंतरही हे गैरसमज दूर होत नाहीत. आणि त्याचे परिणाम त्या व्यक्तीला स्वतःलाच नव्हे तर साहजिकच त्याच्या साथीदारालाही भोगावे लागतात.
प्रचंड गैरसमज असलेली अशीच एक गोष्ट म्हणजे हस्तमैथुन. हस्तमैथून करण्याबद्दल, त्याच्या फायद्या, तोट्याबद्दल अनेक चुकीच्या समजुती तयार झालेल्या आहेत. हस्तमैथुन केल्याने लैंगिक शक्तीचा ऱ्हास होतो, त्यामुळे आरोग्य बिघडते वगैरे वगैरे असे बरेच गैरसमज. एका विशिष्ट वयात आल्यानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलामुळे लैंगिक उद्दीपन, आकर्षण इत्यादी गोष्टी नैसर्गिकरित्या सुरु होतात. या उद्दिपनाला नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात सुरक्षित उपाय म्हणून हस्तमैथूनाकडे पहिले जाते. पण ही हस्तमैथुनाची अगदीच वरवर ओळख झाली.
हा मार्ग अवलंबणे कितपत योग्य/अयोग्य हे समजून घेण्यासाठी आधी आपण हस्तमैथुन म्हणजे नेमके काय हे थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया…
अल्बर्ट एलीस नावाचा एक अत्यंत हुशार मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने 'रॅशनल इमोटीव्ह बिहेवियर थेरेपी' नावाच्या एका प्रसिध्द मानसोपचार पद्धतीचा शोध लावला. सोबतच लैंगिक गोष्टींचा मानसिक दृष्टीने अभ्यास केला. त्यावर मोलाचे संशोधन केले. याच अल्बर्ट यांनी 'मस्टरबेशन' (मराठीत यालाच हस्तमैथुन म्हणून ओळखले जाते) हा शब्द दिला आहे.
लैंगिक अवयवांचे उद्दीपन करण्यासाठी किंवा उद्दीपन झाल्यानंतर ती गरज भागवण्यासाठी स्वतःचीच मदत घेणे म्हणजे हस्तमैथुन. उद्दिपनाच्या दरम्यान विरुध्द लिंगाची व्यक्ती उपलब्ध नसताना हा उपाय वापरला जातो. यामध्ये हाताची बोटे, एखादी सोयीची वस्तू, सेक्स खेळणी इत्यादींची मदत घेता येते. तसेच परस्परांमध्ये सुद्धा हस्तमैथुन करण्यात येऊ शकते. एकमेकांच्या लैंगिक अवयवांचे उद्दीपन करणे याकडे थेट लैंगिक संबंधांसाठी पर्याय म्हणून पहिले जाऊ शकते.
अभ्यासात असे आढळून आले आहे की हस्तमैथुन हे दोन्ही लिंगाच्या व्यक्तींमध्ये कमीअधिक प्रमाणात सारखेच होताना आढळून आले आहे. पण एक तथ्य हे समोर आले की हस्तमैथुन करणारे लोक लैंगिक आरोग्य राखून असतात आणि इतरांपेक्षा जास्त समाधानी असतात.
हस्तमैथुनाचा आणि कुठल्याही लैंगिक, मानसिक आजाराचा काहीही संबंध नसतो.
हस्तमैथुनामुळे शरीराला कुठलाही अपाय होत नाही. हस्तमैथुन ही वयात येणाऱ्या, आलेल्या मुलाची किंवा मुलीची नैसर्गिक गरज असू शकते. हस्तमैथुन केले नाही तर आपल्या ओटीपोटाच्या वर वीर्य साठवण्याची जी पिशवी असते, ती पिशवी भरल्यानंतर अनेकदा वीर्य आपोआप बाहेर येते. त्याला 'नाईटफॉल' किंवा स्वप्नदोष म्हटले जाते. हे व्हायला नको असेल तर हस्तमैथुन हा सर्वाय योग्य पर्याय आहे.
राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे कळले की हस्तमैथुन ही अत्यंत सामान्य आणि सहजपणे केली जाणारी गोष्ट आहे. साथीदार सोबत असतानाही अनेक व्यक्ती हस्तमैथुन करतात असेही दिसून आले. साधारणपणे ९५ % पुरुष आणि ८९ % स्त्रिया हस्तमैथुन नियमितपणे करतात. हस्तमैथुन ही अनेक स्त्रिया आणि पुरुषांनी केलेली आयुष्यातली पहिली लैंगिक क्रिया आहे.
महत्वाचे म्हणजे सेक्स ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. साथीदार सोबत असताना त्याच्यासोबत सेक्स करणे आणि तो नसताना हस्तमैथुन करणे- या दोन गीष्टींतून मिळणाऱ्या लैंगिक सुखात फरक असू शकेल, आहे. पण आपल्या सामाजिक रचनेत सेक्स ही पूर्णतः नैसर्गिक गोष्ट म्हणून पहिली जात नाही. तिला सामाजिक आयाम आहेत. आपण ज्या व्यक्तीसोबत सेक्स करतो, तिच्याशी एकनिष्ठ राहण्याची, तिची जबाबदारी घेऊ शकण्याच्या कुवतीवरून आपली नैतिकता ठरत असते. अशा वेळी सेक्स ची गरज (नैसर्गिक) असलेली प्रत्येक व्यक्ती साथीदाराची जबाबदारी घ्यायला समर्थ असेलच असे नाही. तसे त्याने असलेच पाहिजे ही अपेक्षाही वास्तवाला धरून नाही.
जर समर्थ नसेल तर त्या व्यक्तीने नैसर्गिक लैंगिक गरज तशी दाबून ठेवावी का? ती दाबून धरणे शक्यही नसते आणि व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने घातकही असते. या परिस्थितीत ती लैंगिक गरज तात्पुरती भागवण्यासाठी हस्तमैथुन हा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय आहे.
त्याचबरोबर हस्तमैथुनातून या गरजा भागवल्या जातात तेव्हा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या लोगांची लागण होण्याची शक्यताही शून्य असते. प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या काही लैंगिक विकारांवरही अनेकदा तज्ञ डॉक्टर हस्तमैथुन करण्याचा उपाय सुचवतात. ही एक थेरेपी आहे. आणि जास्तीत जास्त केसेस मध्ये यशस्वी सिध्द झाली आहे.
हे सर्व लिहिण्यामागे एक स्पष्ट उद्देश असा आहे- की आपली आत्ताची तरुण पिढी कट्ट्यावर मिळणाऱ्या अज्ञानी लैंगिक माहितीवर पोसली गेलेली आहे. ही अर्धवट लैंगिक माहिती अनेकदा वयात आल्यानंतर गंभीर लैंगिक समस्या उत्पन्न करते. विकार उत्पन्न करते. हे झाले नाही तर चुकीच्या माहितीमुळे आपण मिळू शकणाऱ्या लैंगिक सुखाला मुकणे निश्चीत आहेच. त्यामुळे या गोष्टी अश्लील म्हणून बोलायच्या टाळल्या जाण्यापेक्षा यावर जागृती होणे जास्त गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment