Thursday, August 2, 2018

हस्तमैथुनानंतर वेदनांवर 'हे' उपाय करा!

प्रश्न: माझं वय ३० वर्षे आहे. अद्याप लग्न झालेलं नाही. हस्तमैथुन केल्यानंतर बराच वेळ गुप्तांगाला वेदना होतात. तसंच पाच-सात मिनिटांतच गुप्तांगाची ताठरता कमी होते. भविष्यात जोडीदारासोबत सेक्स करताना कोणत्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी उपाय सांगा. तसंच गेल्या काही दिवसांपासून गुप्तांगाच्या वरील बाजूस खाज येते. त्यामुळं त्वचाही लालसर झाली आहे. कोणती गंभीर समस्या निर्माण झाली आहे का? यावर काही उपाय आहे का? या समस्येवर उपचारासाठी कुणाकडे जावे? कुणाचा सल्ला घ्यावा? 

उत्तर: हस्तमैथुन करताना तुम्ही खूपच उत्तेजित होता, असं लक्षात येतं. त्यामुळंच गुप्तांगाजवळ ही लक्षणे दिसून येत आहेत. हस्तमैथुन करण्याआधी गुप्तांगावर क्रीम लावावी. तसंच हस्तमैथुन करताना गुप्तांग हळूहळू आत-बाहेर करावे. असं केल्यास त्रास किंवा वेदना होणार नाहीत. भविष्यात तुम्ही जोडीदारासोबत बराच वेळ सेक्सचा आनंद लुटू शकाल! 

No comments:

Post a Comment