Thursday, August 2, 2018

प्रश्न: मी २२ वर्षांची असून, हस्तमैथून करते. माझ्या गुप्तांगाजवळ पुरळ आले आहेत. माझ्या मासिक पाळीची तारीख जवळ आली आहे. अशा वेळी संसर्ग होण्याची भीती वाटते. डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी औषध दिलं आहे. पण मासिक पाळीदरम्यान संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी काय करावं लागेल. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅडचा वापर केल्यास त्रास वाढेल का?

उत्तर: डॉक्टरांनी तुम्हाला दिलेल्या औषधामुळं पुरळ कमी होतील. पुरळ आल्यानं संसर्ग होऊ शकतं, असं मला तरी वाटत नाही. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड वापरण्याआधी डॉक्टरांनी दिलेलं औषध नक्की लावा. यापुढे हस्तमैथून करताना काळजी घ्यावी लागेल. स्वच्छतेकडेही लक्ष द्यावं लागेल. टॉयलेटला गेल्यानंतर स्वच्छता ठेवावी लागेल. हे सर्व करूनही काही फरक पडला नाही तर, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

No comments:

Post a Comment