Thursday, August 2, 2018

व्हर्जनिटी टेस्ट होणाऱ्या ‘हायमेन’बाबत जाणून घ्या या महत्त्वपूर्ण गोष्टी

काही दिवसांपूर्वी नवविवाहित स्त्रीच्या कौमार्याच्या मुद्यावरून तिचा विवाह मोडला होता. पण समाजाच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांच्यातील प्रश्न सुटला. पण खरंच हा प्रश्न सुटला आहे. कौमार्य हे किती महत्वाचं आहे आणि त्याला किती महत्व द्यायचं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्त्रियांचे कौमार्य म्हणजेच व्हर्जिनीटी यावरून तिच्या चारित्र्याबद्दल तर्क -वितर्क लावलं जातं.
काही गैरसमजांमुळे किंवा अपुर्‍या ज्ञानामुळे अनेक मुलींना नाहक बदनामीचा ठपका कपाळी लागतो. म्हणूनच तुमच्या मनात या बाबत असलेल्या काही समज- गैरसमजांना दूर करण्यासाठी या काही गोष्टी वेळीच जाणून घ्या.

सेक्स करण्यापूर्वी जाणून घ्या हायमेन बाबत या ’४′ गोष्टी –
  1. स्त्रियांच्या योनीमार्गामध्ये ‘हायमेन’ नामक  एक नाजूक पडदा असतो. हा कागदाप्रमाणे अगदी नाजूक पदडा असतो. संभोगाव्यतिरिक्त काही शारिरीक कष्टाच्या कामाने तो सहज फाटू शकतो. यावेळेस तीव्र रक्तस्राव न होता केवळ काही थेंब रक्त जाते.
  2. काही स्त्रियांमध्ये हायमेन हा पडदा जाडसर आढळतो. अशा परिस्थितीमध्ये तो फाटल्यास वेदना होतात. रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव मासिकपाळीदरम्यान इतका तीव्र नसला तरीही त्याचे काही डाग कापडावर दिसू शकतात.
  3. अगदीच अपवादात्मक स्थितीमध्ये म्हणजेच सुमारे 1-3% स्त्रियांमध्ये हा हायमेन नामक पडदा अतिशय जाड असल्याने तो संभोगादरम्यानही फाटत नाही. अशावेळी विशिष्ट शस्त्रक्रिया करून तो काढला जातो.
  4. सुमारे 10 -15% स्त्रियांमध्ये जन्मजात हायमेन या पडद्याचे मूळातच अस्तित्त्व नसते. त्यामुळे तो फाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
संभोगादरम्यान पडदा फाटल्यानंतर वेदना, जखम होते. मग अशा परिस्थितीमध्ये नेमका सेक्स किती काळाच्या अंतराने सेक्स करावा हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. अशावेळेस सेक्स करताना या गोष्टींचे भान नक्की ठेवा.
  1. सेक्स दरम्यान हायमेन फाटल्यानंतर वेदना होत असल्यास किंवा रक्तस्त्राव होत असल्यास त्यानंतर काही दिवस सेक्स करणे टाळा. वेदना कमी होईपर्यंत काही दिवस थांबा.
  2. पडदा फाटताना झालेली जखम पूर्णपणे ठीक होईपर्यंत काही दिवस थांबा. काहींमध्ये ही जखम काही दिवसांमध्येच ठीक होते तर काही जणींना महिना लागण्याची शक्यता असते.
  3. जखम सौम्य असल्यास ती 3-4 दिवसांत ठिक होते. मात्र त्याभोवती इंफेक्शन असल्यास महिनाभराचा वेळ लागू शकतो. अशावेळी नैसर्गिकरित्या ती ठीक होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  4. तुमची मानसिक तयारी असेल तरच सेक्सचा आनंद घ्या. काही जणींमध्ये जखमेच्या त्रासामुळे सेक्सबाबत मनात भीती उत्त्पन्न होऊ शकते. त्या दडपणाखाली कोणतीही कृती करू नका. त्यामुळे हा निर्णय व्यक्ती सापेक्ष त्यांच्या मानसिक तयारीवर अवलंबून असतो.
त्यामुळे सेक्स करताना स्त्रीचा आनंद देखील सर्वात महत्वाचं आहे.

No comments:

Post a Comment