Thursday, August 2, 2018

दररोज सेक्स करण्याचे ११ फायदे

वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि आपल्यात आलेले नैराश्य दूर करण्यासाठी रोज सेक्स करणे तितकेच महत्वाचे आहे. जीवनात अनेक चढ उतार येत असतात. काहीवेळा कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर त्यावर सेक्स हा चांगाला उपाय ठरू शकतो. जरा हे विचित्र वाटते. मात्र, यामागे शास्त्रीय कारणे आहेत.
आपले आरोग्य आणि आनंदी जीवनात सेक्सचा मोठ्या हातभार असतो, असे अनेकदा समोर आले आहे. त्यातही रोज सेक्स केल्याचेही मोठ्या प्रमाणावर फायदे आहे.
१) आपल्याला आलेले नैराश्य दूर होते. सेक्सच्यावेळी आपल्या शरीरात डोपामिन नावाचे द्रव तयार होते. त्यामुळे नैराश्य दूर करणाऱ्या हार्मोनचा प्रतिकार करते.
२) सेक्सच्यावेळी तुमच्या शरीराची हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. यावेळी श्वासोश्वासचा वेग वाढतो. त्यामुळे पेशींमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यानंतर थकवा जाणवतो. म्हणजेच तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आठवड्यातून तीन वेळा सेक्स केला तर मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.
३) तसेच मिठी मारणे किंवा सेक्स केल्याने बीपी कमी होऊ शकतो, असा अभ्यासाअंती शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप वरचेवर येत असेल तर सेक्स हा त्यावरील चांगला उपाय आहे.
४) आठवड्यातून तीन वेळा सेक्स केल्यास तुम्ही अधिक तरुण दिसू शकतो. तस सेक्स केल्याने कॅलरिज बर्न झाल्याने हृदय निरोगी राहते. अटॅकचा धोका कमी राहतो.
५) प्रणयातून एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो. दैनंदिन आयुष्यातील उत्साह वाढतो. कामात लक्ष वाढते. शिवाय दोघांमधील नाते आणखी मजबूत होते. दोघांना मानसिक आधार मिळतो. ताणतणाव सहज दूर पळतो. आरोग्य चांगले राहते. प्रणयाचे यापेक्षा अनेक फायदे आहेत. दररोज प्रणय केला तर आजार आपल्याला शिवणार नाहीत. डॉक्टर आपल्यापासून कायम दूर राहिल.
६) दररोज प्रणय केल्याने असे हार्मोन्स रिलिज होतात ज्यामूळे पेनपासून सुटका होते. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक दुखण्यापासून अगदी शंभर टक्के सुटका होते, असे नाही. पण दुखण्यात घट झाली असल्याचे निश्चितच लक्षात येईल. त्यामुळे वारंवार पेनकिलरच्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.
७) आधी महिलांसाठी जिम सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. पुरुषही व्यायाम करण्याचा आळस करायचे. तेव्हा बेडवरच प्रणयाच्या माध्यमातून व्यायाम करणे आरोग्यवर्धक आहे. या प्रकारच्या व्यायामाने शरीराच्या शीरा मोकळ्या होतात. हार्टबिट्स चांगले राहतात. जर तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ प्रणय करीत आहात तर 85 कॅलरीज बर्न करीत आहात, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
८) दररोज प्रणय केल्याने testosterone आणि estrogen चांगले राहते. या हार्मोन्समध्ये घट झाली तर शरीराशी संबंधित अनेक आजार जडू शकतात. महिलांना उतरत्या वयात त्यांचा मोठा त्रास होतो. प्रणय केल्याने या हार्मोन्सची संख्या संतुलित राहते. शिवाय पुरुषांचे आर्युमान वाढते.
९) प्रणय केल्याने दात पांढरे राहतात, हे सिद्ध झाले आहे. सिमेनची जागा कॅल्शिअम, झिंक आणि इतर मिनरल घेतात. त्याच्या फायदा दातांना होतो.
१०) हनिमून झाल्यावर घरी परतलेल्या कपल्सच्या केसांना वेगळीच झळाळी मिळालेली दिसून येते. त्याचे कारण तुमच्या हनिमुनमध्ये दडले असते. कारण प्रणयाचे अनेक सेशन्स झाल्याने त्याचा लाभ केसांना झाला असतो. त्यामुळे तुम्ही केसांची महागडी ट्रिटमेंट घेत असाल तर जरा थांबा…हा पर्याय चांगला आहे.
११) प्रणयात अनेक गुण दडलेले असतात. त्याचा स्किनलाही फायदा होतो. स्किन मऊ, मुलायम आणि चमकदार होते. त्यामुळे स्किन ट्रिटमेंट किंवा ब्युटीप्रॉडक्ट वापरण्याची गरज भासत नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही नाहिशा होतात. त्यामुळे पार्टनरला खुष ठेवा आणि आरोग्य चांगले राखा..

No comments:

Post a Comment