Thursday, August 2, 2018

सेक्सबद्द्लची निराशा दूर करण्याचा उपाय

सेक्सबद्द्लची निराशा दूर करण्याचा उपाय
सेक्स ही प्रत्येक विवाहीत पुरूष-महिलेच्या जीवनातील अत्यंत महत्वाची आणि आरोग्यदायी गोष्ट असते. सेक्सने फक्त आनंदच मिळत नाहीतर मानसिक, शारिरीक आरोग्य सुद्धा मिळतं हे सिद्ध झालं आहे. कामाचं टेन्शन, थकवा सेक्स केल्याने लगेच जाऊ शकतो. शिवाय तुम्ही ताजेतवाणे होता. पण, विवाहीत जोडप्यांमध्ये सुरवातीला सेक्सबद्दल असलेली मोठी उत्सुकता पुढे हळूहळू कमी होत जाते.
खासकरून पुरूषांचा उत्साह एक ते दिड वर्षात कमी झालेला आढळून येतो. सुरूवातीला रोज केला जाणारा सेक्स पुढे आठवड्यातून दोनदा, नंतर आठवड्यातून एकदा आणि त्यानंतर महिन्यातून दोनदा वगैरे केला जातो. सेक्सबद्दल कमी होणा-या ओढीची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र, सेक्समधील हीच तुमची कमी झालेली रूची वाढवता येऊ शकते.
सेक्सबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये दिसून येतात. मात्र, या गैरसमजांना दूर करणे तुमच्याच हातात आहे. सुरवातीला सेक्सचे असलेले मोठे आकर्षण नंतर विविध कारणांनी कमी होत जाते. पण तोच आनंद पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आसनांचे प्रयोग करू शकता. एकच एक आसन करून अनेकांना बोर झालेलं असतं. अशावेळी वेगवेगळ्या पोजेस करून तुम्ही सेक्समध्ये रूची वाढवू शकता. असं वेगळं काही करण्यात स्त्री सुरवातीला नक्की लाजेल. नाही म्हणेल. त्यासाठी जोडीदाराशी व्यवस्थीत बोलूण, याचं महत्व पटवून देऊन आणि विश्वासात घेऊन समजावून सांगा. वेगवेगळ्या आसनांचा निट अभ्यास करा. त्यानंतरच त्याचा अवलंब करा. अन्यथा चुकीचे काही केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यूट्य़ूबवर वेगवेगळ्या आसनांचे अनेक व्हिडीओ आहेत. त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.
एक गोष्ट लक्षात घ्या की, सेक्स ही अशी गोष्ट आहे ज्यात दोन व्यक्तींची ईच्छा खूप महत्वाची ठरते. दोघांनाही सेक्स करण्याची ईच्छा असेल तरच त्याचा आनंद घेता येतो. अन्यथा दोघांपैकी कुणा एकाची ईच्छा नसेल आणि दुस-याची असेल असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, ऎकमेकांच्या भावनांचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. सेक्स ही प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्वाची गोष्ट असून त्यात फार मोठा खंड पडता कामा नये. यासाठी वेगवेगळ्या आसनांचा प्रयोग करून सेक्सचा आनंद घेणे कधीही दोघांच्या फायद्याचे ठरू शकते.

No comments:

Post a Comment